STORYMIRROR

Sanchita Raut

Others

3  

Sanchita Raut

Others

स्पर्श..

स्पर्श..

1 min
222

वाऱ्याचे काही असेच असते, हळूच स्पर्शूनी जातो

नि:शब्द कळ्या फुलांना, स्मित हास्यात खुलवून जातो !


येणे जाणे जरी तयाचे, अस्तित्व मागे ठेवून जातो,

स्मरण होताच कधी, मन प्रसन्न करून जातो !


मौनाचा पहारा मौनात, बरेच काही बोलून जातो,

स्पर्शाताच शब्द, भावना मनी फुलून जाते !


खेळ असा लपाछपीचा, असाच रंगी रंगुन जातो,

सांज सकाळच्या उन्हात, अलगद वाराही मिसळून जातो !


सावरणे ते चांदण्याला, स्वभाव गगनाचा तो,

हरवल्या तारकेला, क्षितिजा पल्याड शाधतो !


Rate this content
Log in