मेघ
मेघ
सुकलेल्या धरणीला
ओलाव्याची फुंकर
हलकेच वितळते पहा
वियोगाचे डोंगर
नजरेत मावेना
रिमझीमणारा आनंद
श्वासालाही जानवे
मोकलेपणाचा सुगंध
खेळते गीत मधुर
हस्याशी लपंडाव
वादळे पार करुनी
झाला मायेचा वर्षाव
हाताच्या रेषेवरी जसा
जसा तुषार तो नाचतो
शीतल वारा कानात माझ्या
खुदकन हसतो
मोहरलेल्या ओंजळीतले
थेंब ओठाने मोजले
तहानलेल्या पाखराला
मेघाने अमृत पाजले ...
