आस...
आस...


रुसलेल्या राधेला,
कृष्ण म्हणतो हास
पण कृष्णाला माहित नाही,
राधा रुसली का आज....
प्रेमाने पुसाव ही,
राधे मनी आस...
पण कृष्ण आहे कोड्यात,
नेमकं झालं काय आज....
प्रेमाच्या पारड्यात,
दोघं आहेत समान ....
मनी मात्र दोघांच्या,
एक दुसऱ्याचे ध्यान ...