पाऊस गाणे....
पाऊस गाणे....

1 min

191
तळपणारं ऊन संपून, पाऊसाची चाहूल येते.
पांढर शुभ्र ढगांवर काजळाचे तीठ पसरते.
नभातील थेंब असे काही मिसळून जाते.
मातीच्या सुगंधात मन प्रसन्न होऊन जाते.
निसर्गाचे काहीसे रूपच बदलते,
नव्याने हे रूप मनी रुजते बसत..
पक्षांचे सुर चोहीकडे घुमते,
सुरांचीही रांग मंत्रमुग्ध करते...
नदीचे पाणी असे खळखळत वहाते,
हळूवार हसू हे ओठांवर फुलवते...
डोंगर मात्र हिरवी चादर ओढून नटते,
नयनरम्य क्षण हे डोळ्यात टिपते...
प्रत्येक पाऊस काहीस देऊन जातो..
गोड आठवणींचे अंकुर मनात रुजवून जातो..
रुजलेले अंकुर मनी वर्षभर बहरते ...
पावसाची वाट बघणं मग भागच होते.......