रात गं
रात गं
अशी पावसाळी सखे रात गं
सरी आठवांच्या बरसतात गं ।।१।।
तुझा मल्मली स्पर्श छळतो मला
नको येत जाऊस स्वप्नात गं ।।२।।
खपेना कुणाचे भले, चांगले
असे मत्सरी लोक विश्वात गं ।।३।।
तुझ्या संगतीनेच गंधाळतो
मला रोज तू माळ केसात गं ।।४।।
जगावे असे अन् मरावे असे
उरावे जगी खास प्रख्यात गं ।।५।।

