STORYMIRROR

Ankit Navghare

Romance Classics

3  

Ankit Navghare

Romance Classics

राधा-कृष्ण

राधा-कृष्ण

1 min
366

जेव्हा राधेचा शेवटचा क्षण समीप येत होता...


जीवनाच्या उत्तरार्धात कृष्ण नि राधा जेव्हा भेटले...

तेव्हा कदाचित राधा बोलली असावी...


आता ओढ लागलीया कृष्णा तुला पाहण्याची...

संपली रे हद्द आता तुझा विरह सहण्याची...


वनात तू बासुरी वाजवुनिया गाईगुरे चारले...

तुला जिंकता जिंकता मी आत्ता स्वतःच हरले...

पण दुःख नाही की या जन्मात तू मला न वरले...


तुझ्यात सामावण्यासाठी सोडतिया 

आता मी ही शरीराची बंधन

तुच माझा देव धुप दिप चंदन 


नाहिये मला या मर्त्य शरीराची आसक्ती...

विलीन होईल आत्मा अनंतात 

करावया तुझीच भक्ति...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance