पुण्याई
पुण्याई
तुझ्यावाचून अंगणातल्या
तुळशीने टाकली मान
तुझ्यावाचून घरादाराच
हरपले देहभान
माजघरातून येत होता
काल पैंजणांचा नाद
आज मात्र मी अज्ञातात
तुला घालतोया साद
तुझा तो हसरा चेहरा
केसात बहरलेला मोगरा
सांग आपल्या प्रेमाला
लागल्या का नजरा
काय सांगू सोनूलीला
कोठे तिची आई
तिने घेतला जगाचा निरोप
तुला जन्म देण्यापाई
तुला परत आणण्यासाठी
कुठून आणू पुण्याई
