STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

पुन्हा जन्मायचे आहे

पुन्हा जन्मायचे आहे

1 min
217

वृत्त : वियदगंगा

लगागागा लगागागा लगागागा लगागागा

   


मनाच्या वाळवंटाला मला सिंचायाचे आहे 

तिथे रोपास स्वप्नाच्या पुन्हा लावायचे आहे


नको जाळूस काटयांना जरासे रक्त काढू दे 

तुला जीवन गुलाबाचे मला सांगायचे आहे


नको दावूस श्रीमंती गरीबांना तुझी वेड्या 

स्मशानाच्याच वाटेने तुलाही जायचे आहे 


किती लपवून ठेवू मी मनाच्या खोल घावांना

जगाला शल्य जन्माचे अता दावायचे आहे 


उडाली राख देहाची जरी आगीत युद्धाच्या

मला राखेत प्रेमाच्या पुन्हा जन्मायचे आहे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy