STORYMIRROR

Sharad Kawathekar

Classics

3  

Sharad Kawathekar

Classics

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा

1 min
155

आभाळ कोसळतंय

कोसळत्या आभाळाखाली

एक झाड

आपलं उदासगीत गात

सुकलेले आसव टिपत

आपल्याच सावलीत 

आपल्या सावलीबरोबर मग्न

शरीराला वाळवी लागलीय 

अवयव खचलेत

बंध सैल झालेत

तरीसुद्धा ....

आपले रंगीत श्वास 

आपलं गुलाबी लावण्य

एकांतातले हळूवार क्षण आठवत 

आपली जिवंत मरणकथा

कोसळत्या आआभाळाला सांगत 

तिथंच उभाय

एका वेड्या आशेवर

कदाचित या वाळवी लागलेल्या 

शरीरावर एखादं चुकार अंकुर

येईल

पुन्हा रंगीत श्वास घेता येईल 

पुन्हा एकदा गुलाबी लावण्य खुलेल

पुन्हा एकदा ........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics