पुढे पुढे चालावे
पुढे पुढे चालावे
बोट धरुनीया माता
उभे करिते जीवनी
टाकता पहिले पाऊल
आनंदते ती मनोमनी
चालावे टाकत पाउल पुढे
नियमच आहे जगण्याचा
पुढे पाऊल दावी प्रगती
साधण्या उत्कर्ष स्वतःचा
येता जरी संकटे मार्गी
सतत चला चला पुढे
अविरत धावे सरिता
पार करी कपारीचे कडे
अरुंद वाट वाकडी
घेत काळजी क्षणभरी
अनुभवाने व्हावे शहाणे
पुढे चालणे योग्य खरोखरी
पुढे पुढे चालावे
यातच आहे जीवन मर्म
साधा किटक कोळी पहा
जाळे विणण्याचे करी कर्म
