STORYMIRROR

Charushila Vaidya

Inspirational Others

4  

Charushila Vaidya

Inspirational Others

पत्नी - पतीच्या जीवनातील सुंदर मैत्रीण

पत्नी - पतीच्या जीवनातील सुंदर मैत्रीण

1 min
282

परिजातकाचा सुवास ती...

निरपेक्ष प्रेमाचा अतुट बांध ती...

पतिच्या जिवनाची अर्धांगिनी ती...

त्याच्या जिवनातील सर्वांत सुंदर मैत्रीण असते ती...

सासु सासरे आपले आई वडील मानते ती...

पतीची परमेश्वर मानून चरण सेवा करते ती...

सगळ आयुष्य स्वतःच्या सासर साठी वाहते ती...

त्याच्या जीवनातील सर्वात सुंदर मैत्रीण असते ती...

ना कधी रुसते ना कधी रागावते चारचौघात ती...

परंतु जेव्हा एकटा पडतो पती तेव्हा त्याच्या सवे आसवांच्या सागरात बुडते ती...

सुखाची छाया देत समाधानाचे चांदणे टीपते ती...

त्याच्या जीवनातील सर्वात सुंदर मैत्रीण असते ती...

सासरचे गुण जन्मभर जगभर गाते ती...

सांभाळून सर्वांना घराचा स्वर्ग करते ती...

एकमेकांतील वाद सारे संपवते ती...

त्याच्या जीवनातील सर्वात सुंदर मैत्रीण असते ती...

माहेरच्या आठवणीत लपून क्षणभर डोळे ओलवते ती...

सोडून आपल्या दाराला परक्या संसाराचे मनोरे रचते ती...

किती मिळतो त्रास तरी सासर नेहेमी आपलेसे करते ती...

त्याच्या जीवनातील सर्वात सुंदर मैत्रीण असते ती...

पतीच्या मनभरणी साठी साज श्रृंगार करते ती...

मनात येता कधी मोगऱ्याचा गजरा केसात माळते ती...

आरश्या समोर उभी राहून घडी घडी सुंदरतेची साक्ष मागते ती...

त्याच्या जीवनातील सर्वात सुंदर मैत्रीण असते ती...

पतीच्या गुणदोषांसकट स्वीकारून जगते ती...

त्याच्या जीवनातील सर्व कोड्यांना सहज सोडवते ती...

डोळ्यात प्रेम शोधत थोड्या मायेची अपेक्षा करते ती...

त्याच्या जीवनातील सर्वात सुंदर मैत्रीण असते ती...

पतीच्या पतीपण सहन करते ती...

सर्व दुःख मनात कोंडून जगते ती...

जेव्हा सुटते साथ तिची तेव्हा त्याला कळते ती...

त्याच्या जीवनातील सर्वात सुंदर मैत्रीण असते ती...

कधी आई असते तर कधी असे मुलगी असते ती...

कधी बहीण तर कधी सून असते ती...

जीवनाचे हे सर्व पात्र निभावते ती...

त्याच्या जीवनातील सर्वात सुंदर मैत्रीण असते ती...

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational