STORYMIRROR

Charushila Vaidya

Others

4  

Charushila Vaidya

Others

श्री सद्गुरू सामर्थ्य

श्री सद्गुरू सामर्थ्य

1 min
217

 तुझे कौतुक प्रत्येकाला इथे रूचेलच अस नाही,

कौतुकासाठी तुझ नाव सुचेलच अस नाही,

तु मात्र इतरांच कौतुक करण्यास कचरु नकोस,

सद्गुरु पाहतायेत तुला 

नाव घ्यायला तु विसरू नकोस

जय जय रघुवीर समर्थ


 वाटेत येतील खुप आडवे लोक ,

पायात पाय घालुन पाडतील,

त्यांना घाबरुन तुझ उभ राहण तु सोडु नको,

सद्गुरु आहेत पाठीशी तु नाव घ्यायला

 विसरू नकोस

जय जय रघुवीर समर्थ


तुला सुद्धा मन आहे हे माहिती त्याला

पण सद्गुरू मनी वसलेले असताना काय रे कमी तुला

इतरांना भरभरुन द्यायला कमी पडु नकोस,

सद्गुरु आहेत पाठीशी 

तु नाव घ्यायला विसरु नकोस

जय जय रघुवीर समर्थ


 तुझ्या चांगल्या वाईट कर्माचे पुरावे तुला इतरांना द्यायची गरज नाही

कोणी मन दुखावल तरी माझे कार्य सोडायचे नाही

सद्गुरू कार्या प्रती केलेल्या संकल्पासाठी

पुढे चालन तु सोडु नकोस

सद्गुरु पाहत आहेत 

तु नाव घ्यायला विसरू नकोस

जय जय रघुवीर समर्थ


 रडावस वाटत तेव्हा रडुन मोकळ कर स्वताःला

कार्यासाठी लढाव लागेल तेव्हा लढून मोकळा हो

रडत असताना मात्र तुझे इतरांप्रती असलेले कर्तव्य तु विसरू नको

सद्गुरु आहेत पाठीशी तु नाव घ्यायला विसरु नकोस

जय जय रघुवीर समर्थ


Rate this content
Log in