STORYMIRROR

Rucha Rucha

Tragedy Others

3  

Rucha Rucha

Tragedy Others

पृथ्वीची विनवणी

पृथ्वीची विनवणी

1 min
186

हे मेघराजा!

जरा खाली पाहशील?

उन्हाने व्याकुळतेय मी

थोडासा बरसून

परत येशील?।।


माहितेय मला 

मनुष्याने पाण्याशी 

केली खूप मस्ती

म्हणून त्यांची

तू तोडलीस दोस्ती।।


अजाण आहेत बिचारे

 तू आहेस जाणता

मोठे मन करून

कर माफ आता।।


बघ माझी लेकरे 

ती कशी व्याकुळती

पाणी अडवा 

पाणी जिरवा 

धोरण किती राबवती।।


बस्स ना आता 

 झाली फार कट्टी

तू परत येऊन

मार घट्ट मिठी.।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy