STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance

3  

Abasaheb Mhaske

Romance

प्रश्न.. ती सध्या काय करते ?

प्रश्न.. ती सध्या काय करते ?

1 min
14.9K



का कुणास ठाऊक ? का असं होतं...

हे कसले ऋणानुबंध म्हणावे ?...

हवीहवीशी अनिवार ओढ गडे

नाहक मजला उगाच छळतो ?

निरंतर प्रश्न भाबडा... ती सध्या काय करते ?


राहून राहून वाटत राहते कुठे असेल ती

कशी असेल ती ? दुःखी - कष्टी की

सुखी असावी ती उगाच वाटते ...

आणि हुरहूर मनी, तिच्या आठवणी

निरंतर प्रश्न भाबडा ...ती सध्या काय करते ?


तशी ती माझी कोणी लागत नाही तरीही

आठवणींशिवाय माझं काही भागात नाही

नाही जरी उधार उसनवारी येणे तरीही ...

निरंतर प्रश्न भाबडा खटकत राहतो ...

रुख रुख मनाला लागून राहते ती सध्या काय करते ?


विसरू पहावं तर आठवत जाते

रात्रंदिनी उगाच छळते ...

मनास मजला कसं ग आवरू ?

तूच सांग ना गडे ? प्रश्न भाबडा

छळत राहतो ती सध्या काय करते ?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance