प्रपोज
प्रपोज
हळव्या मनाला
आसवांची साथ
देशील का माझ्या
हातात तुझा हात.......१
आकाशी शेखरा
मिळे ताऱ्यांची साथ
होशील का जीवनी
तू पणतीची वात........२
वसुंधरेला जशी
पावसाची साथ
करशील का तू
तशीच प्रेम बरसात.......३
उन्हास असे जशी
छायेची साथ
देशील का सावरण्या
तुझ्या मायेची कात......४
सागरा उसळत्या
लाटांची साथ
राहशील का आवरण्या
बेधुंद मना जीवनात.........५
संसार सुखाला
हिरवळीची साथ
शोधशील का हास्यतरंग
येऊन माझ्या घरात.............६
उरली एकच मनिषा
वास तुझा हरेक क्षणात
भरेन प्रेमरंग तुझ्या
मेहेंदीच्या हातात..............७
जुळवू हा ऋणानुबंध
दोन जीवांचं नातं
देशील का तुझा
हात माझ्या हातात............८

