प्रियकर
प्रियकर


प्रत्येक तरुणाईच्या आयुष्यातील धोक्याचे वळण म्हणजे प्रेयसी आणि प्रियकर
वयात आल्यावर होतात कल्पना,
ती अशी असावी तो असा दिसावा...
तो कोणासाठी सुखावणारा क्षण...
कुणासाठी अवघड जागेचे दुखणे...
आजच्या पिढीसाठी प्रेम म्हणजे व्यवहार,
निखळ प्रेमाचे नाते
आहे कारे कुणात,
कच्च्या प्रेमापेक्षा
परिपक्व मैत्री असावी,
याचा त्याचा हेवा करून
खोटी ओढ नसावी,
खोटी ओढ नसावी,
माझा कल्पनेत प्रियकर असा असावा,
त्याच्या दिसण्यापेक्षा, त्याचे असणे महत्त्वाचे वाटावे,
बँक बॅलन्स श्रीमंती,
महागडी शॉपिंग गिफ्ट नको मला,
हवे गुलाबाचे सुंदर फूल,
त्यात सुगंध त्या वेड्याच्या प्रेमाचा,
नकळत ओळखावी भावना त्याने,
समजून घ्यावे तेही, मी बोललीच नाही, जे कधी...
नसावी तोड त्याच्या नजरेतील
ओढीला कशाची
त्याचे प्रेम भास नव्हे,
सत्य असावे, प्रेमात नसावा अधिकार,
प्रेमात तर कर्तव्य साधे... त्याचे माझे नाते
फक्त त्याचे माझे नाते...