STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

2  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

प्रिये तुला

प्रिये तुला

1 min
13

असे कसे सुने सुने जगायचे प्रिये तुला

 दिव्या परी तमा मधे जळायचे प्रिये तुला


 उन्हात पावसात वादळात कातळात मी 

कशास कोरड्या जगी फुलायचे प्रिये तुला


 मला असेल ठाव फक्त धून वादळातली 

कशास वादळासवेच गायचे प्रिये तुला


 लबाड हे नशीब खेळते लपाछपी किती 

कशास भाग्य जाळुनी बघायचे प्रिये तुला 


गुलाब साथ देत कंटकास राहतो कसा

 कशास कंटकासवे रमायचे प्रिये तुला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy