STORYMIRROR

Shobha Wagle

Romance Tragedy

3  

Shobha Wagle

Romance Tragedy

प्रिये कां गं?

प्रिये कां गं?

1 min
224

माझाच विश्वास बसत नाही

कां मी भाळलो इतका तुझ्यावर?

एवढं तकलादू प्रेम केलं होतं तू

मी नसताना भाळली दुसऱ्यावर!


कॉलेज मध्ये प्रेमाचे कित्ते गिरवले

आई बाबांनी ही मानली होती सून

दोन वर्षी मी परदेशी गेलो काय?

मला टाकून तू झाली परकी स्वतःहून!


खरंच जिवा पलीकडे जपलं असतं

माझ्या हृदयाची राणी होती गं तू

काळजाचे तुकडे केले गं माझ्या

ह्या दुःखातून सावरू कसा सांग तू?


तुझ्या शिवाय जगण शक्य नाही मला

रोज रात्री पाहतो मिठीत माझ्या तुला

आता तू माझी नाही विश्वास ठेवू कसा?

पण तुझ्या शिवाय चैन पडत नाही मला.


शुभेच्छा देतो तुला आनंदात रहा सदा

माझी पतारणा केली तशी करू नको कदा

प्रेम एकदाच होते ह्यावर विश्वास माझा

त्याच्या विश्वासाला मात्र पात्र हो सदा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance