प्रिय डायरी....
प्रिय डायरी....
पाहता क्षणी मन हरवते तुझ्यात
मग मी न राहते माझ्यात ,
सगळे उतरते तुझ्यात
शब्द रूपाने लिहिते मी स्वतःलाच तुझ्यात
तुजवीण कल्पना करणे म्हणजे
अशक्य माझे जीवन
तूच माझी प्रिय सखी,
जेव्हा असते मी आनंदी अन् दुःखी,
तूच देते मज आधार ,
शब्द करतात संगत
त्यानेच येते लिहण्या रंगत
सोबत तुझी शेवटपर्यंत हवी,
रोजच तू माझ्यासाठी असे नवी
तुझ्यामुळेच घडतील उद्याचे कवी ....