STORYMIRROR

Pratibha Vibhute

Fantasy

3  

Pratibha Vibhute

Fantasy

परिवर्तन

परिवर्तन

1 min
341

सृष्टीचे फिरते कालचक्र

परिवर्तन हाच असे नियम

कधी सुख तर कधी दु:ख

तरी मनावर असावा संयम...१!


निशा सरता सूर्योदय होई

दूर करतो जगात अंधकार

पहाटचे सोनसळी पसरली

सृष्टीत घडे सुंदर चमत्कार...२!


वसंत ऋतूचे आगमन होता

पानगळ होऊन फुटे पालवी

सृष्टी सजली नववधू सारखी

तृणपाती हलती वाटे लाघवी...३!


वर्षाऋतूचे अलवार पाऊल

सावळे मेघ नभांगणी दाटले

बरसती अवचित पाऊसधारा

मेघ,अवनी आनंदाने भेटले...४)


सृष्टीचे कालचक्र सुरळीत चाले

परिवर्तन जीवनात नियम खरा

माणुसकीची जाणीव सदैव ठेवा

जगण्यात, फिरण्याचा आनंद खरा...५!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy