Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

VINAYAK PATIL

Romance

4  

VINAYAK PATIL

Romance

प्रित तुझी माझी

प्रित तुझी माझी

1 min
254


तुझी माझी प्रीत जणू 

पावसात बहरली 

तुझ्या माझ्या या नात्याला 

ओढ प्रेमाची लागली ||१|| 


तू येता जीवनी माझ्या 

येती असे नवेपन 

तुझ्या अमूल्य साथीने 

बदले माझे जीवन ||२|| 


गैरसमज जाहला

आली कित्येक संकटे 

धैर्याने सामना करू 

येतील वळनी काटे ||३|| 


आयुष्याच्या वाटेवरी 

भेट जाहली दोघांची 

येतील खाचखळगे 

साथ निभवु दोघांची ||४|| 


आपल्या दोघांचं नातं 

फुलाप्रमाणे फुलावं‌ 

राग रुसवा सारुनी 

आयुष्य सुखी जगावं ||५|| 


Rate this content
Log in