प्रित फुला रे
प्रित फुला रे
प्रित फुला रे प्रित फुला
मिठीत घेशी हळूच मला
उमलून झाली रात कोवळी
माळून देशी हार मला
प्रित फुला रे प्रीत फुला
मंद मंद तो अबोल वारा
वाहू लागला नदी किनारा
थबकत येशी परीनच दिसशी
मिठीत घेशी हळूच मला
प्रित फुला रे प्रित फुला
कवितेस दे शब्द मला
रचील मी रे स्वप्न भावना
देशील का तू सुर मला
प्रित फुला रे प्रित फुला
देवून जा तू गित मला
गुणगुणावे गीत वाटे
देशील का तू साद मला
प्रित फुला रे प्रित फुला
मिठीत घेशी हळूच मला.

