STORYMIRROR

गीता केदारे

Romance

4.9  

गीता केदारे

Romance

... प्रीतफुले...

... प्रीतफुले...

1 min
851


ओझरत्या नजरेनेच आज तिने माझ्याकडे पाहिलं

एका कटाक्षातच कायमचं चक्षुत सामावून घेतलं

मी मात्र संभ्रमातच कोणी काळीज घायाळ केलं

होतं जे काही माझं ते फक्त तिचं व तिचंच झालं...


नजर माझीही सारखी तिच्याकडंच फिरकत होती

लज्जेने लाजलेले यौवन पदरात लपवत होती

चुकवून एकमेकांना नजरानजर होतच होती

प्रेमाची लाली गालावर तिच्या गुलाबी होत होती...


धडधडणाऱ्या ह्रदयाला प्रेमाची साथ होती

अबोल या भावनांना स्पंदनाची आर्जवे होती

नयनांत एकमेकांच्या प्रणयाची नशा होती

क्षणभर प्राप्त प्रेमातून प्रीतफुले वेचीत होती....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance