प्रीतीच्या झुल्यावर
प्रीतीच्या झुल्यावर
मला झुलायचं आहे सख्या
तुझ्या प्रीतीच्या झुल्यावर
तुझ्या त्या गोड स्वभावाच्या
प्रेमाच्या अबोल आशेवर..!
स्वभावाची झाली तुझ्या मला
मन भावणारी जाणीव वेगळी
त्यातच आठवेनासे झाले काहीच
विसरून गेली स्वतःलाच सगळी..!
आनंदाचे वारे वाहू लागले मनी
तुझ्या प्रीतीच्या त्या झुल्यावरी
देहभान विसरून सगळे माझे
विश्वास बसला फक्त तुझ्यावरी..!
झुळूक वाऱ्याची मोहक आली
मन मोहून गेले या वाऱ्यामध्ये
तुझ्या त्या प्रेमाच्या वाऱ्यासवे
आनंदी प्रीतीच्या झुल्यामध्ये..!
जेव्हा पाहले स्वप्नी तुला मी
स्पर्श होवू लागला हृदयाला
आनंदाला आली उधाण माझ्या
जिव तुझ्यातच असा गुंतून गेला..!
तुझा भास होताच हृदयाला
माझ्या मनाची दिशा बदलते
आठवतानी तुला मन माझ मला
वेगळीच दिशा दाखवून देते..!

