प्रीतीची जाण
प्रीतीची जाण
असाच अचानक एके दिवशी
भेटलास जेव्हा मज तू सख्या रे
आयुष्याने घेतले सुखद वळण
माझे मलाच कसे ना कळले रे
या वळणावर वसे स्वप्नांचे गाव
वाट नागमोडी खुशीत धावते रे
या वाटेवर चालताना आपसूकच
बदलली बघ माझी ही चाल रे
स्वप्नांचे गाव सुंदर मखमली
हरपून गेले माझे भान रे
स्वप्न हे जर उतरले सत्यात
जीवन माझे सार्थक होईल रे
जगण्याला नवा अर्थ मिळाला
प्रीतीची करून दिलीस जाण रे
हताश , दुःखी अन् घायाळ मनावर
घातलीस हळुवार फुंकर अशी रे

