प्रीती फुले
प्रीती फुले
प्रीत तुझी माझी अशी फुलली
तुझ्या बाहुत मी... रे ...झुलली
एक गोडवा प्रेमातला
छेडीता झाला तनाला
नाजूक हळव्या मनाला
कानात हळूच बोलली
प्रीत तुझी न माझी अशी फुलली..
तुझ्या बाहुत मी ...रे...झुलली...ll१lll
स्पर्श करता बहरुन आली
प्रेमाची फुले उमलली
येता मिठीत मी तूझ्या
चिंता कशाची न उरली
प्रीत तुझी न माझी अशी फुलली ....
तुझ्या बाहूत मी ...रे...झुलली.......ll२ll
चाखत अनोखी धुंद प्रेमाची
जी गुपिते होती आत दडली
नकळत सारी बाहेर रे पडली
मोकळे स्वछ झाले हे आकाश
त्याच्या भेटीत जमिन भिजली
प्रीत तुझी न माझी अशी फुलली...
तुझ्या बाहूत मी रे ..झुलली..........ll३ll