STORYMIRROR

Swati Bhat

Romance

4  

Swati Bhat

Romance

हळवा पाऊस

हळवा पाऊस

1 min
231

खिडकीतुन पाऊस पाहताना

हळवे मन आले भरून 

वाटले लिहावेसे ह्या पावसावर

खूप काही भरभरून,

पण मग उमजले की

 

लिहिण्या सारखे काही नाही.

पाऊस पडताना कुणी तरी

आपली पण आठवण काढत असेल 

त्या आसुभरल्या नजरेत,

अशीच एक ओली संध्याकाळ तरळत असेल

 

ती एकाच छत्रीतली संकोचित घसट,

पाहून आपल्याला आडोसा सुद्धा लाजला होता पुसट

ती दोघांच्या अर्ध्या भिजल्या अंगावरची

ओली चिंब शिरशिरी.....

स्मरता अजूनही येते भरभरून हुडहुडी

 

झाडाखाली टपटपणारे ते पानावरचे पाणी

तुझ्या माझ्या शिवाय तिथे नव्हते आणि कोणी

अशा किती आठवणी त्या विसरायच्या?

का केवळ पावसाच्या धारासंगे डोळ्यातून वाहायच्या ?

 

लिहित बसले ह्यावर कविता तर ती सुद्धा जाईल वाहून;

शब्द होतील मुके आणि भाव जातील विरून .......



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance