STORYMIRROR

Swati Bhat

Romance

3  

Swati Bhat

Romance

तृषार्त घन

तृषार्त घन

1 min
218

बरसणारा घन

अवचित आभाळी विरसला.

आतुरतेने एकटक

 तुझी वाट पाहता पाहता

ओघळणारा अश्रू ही

 नकळत डोळ्यातच थिजला.


गहिवरला कृष्ण मेघ

अलिवार दूर दूर झेपावला.

परी तुझ्या स्मृतींचा आवेग

मनी कोसळत गेला.

घाव भरल्या जुन्या जखमांना

पुन्हा ओलावून गेला.


दाटून आलेल्या आभाळात

काजोळ साकोळला.

एक आर्त कातर स्वर

अंतरी निनादत राहिला;

निश्वासाच्या सुरात मिसळुन

नजरेतुन ठिपकत राहिला.


कोसळणाऱ्या सरींना

धुसर नजरेने पहात राहिला.

चिंब ओलेत्या देहावर

तुझ्या स्पर्शाची आस उमटवुन गेला.

आज अचानक मेघ मल्हार

आर्त सुरात मनी आळवला.

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance