STORYMIRROR

Swati Bhat

Romance

3  

Swati Bhat

Romance

वादळवाट

वादळवाट

1 min
203

नभी चमकणारा तळपता सूर्य

उगीचच वाकुल्या दाखवीत गेला

दाटून आलेल्या काजळ मेघां आड

पुन्हा पुन्हा डोकावत चमकला

 

ह्या खट्याळ सूर्याची जिरवता जिरवता

निळा सावळा  मेघ नभी ओथंबून गेला

झाकोळुनी रवीला अनिवार होउनी 

 तृषार्त धरतीवर बरसत राहिला

  

तनुवर झिलमील  पाऊस झेलताना

तुझ्याच स्मृती बरसत गेल्या

ओंजळीत हळुवार पाऊस मिटताना

तुझाच चेहरा मनोमनी झळकला

 

वाफाळलेल्या उष्ण चहाच्या कपाला

तुझ्या प्रेमाचा ओलावा लपेटला

भिजल्या पंखावर ओल थिरकताना

तुझ्या उणीवेचा उष्मा ऊर भाजून गेला


बेहोष सरींची धार काळीज कातरताना 

 तुझ्या ओढीचा कढ कातर मना भुलावला

टपटपणारी मोत्याची सर निरखताना

गालावर टपोरा सर सरसर ओघळला


मीलनातूर  देह झेलताना चिंबधारा 

कृष्णमेघ कसा बेभान कोसळला

गर्द निळाईतुन मृद् गंध दरवळतां

रोम रोम  मोकाट वादळवाट जाहला



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance