देहभान
देहभान
झाकोळल्या मेघातुनी
चिंब मोतीबिंदू सरसरले.
स्पर्शिता तू मोत्यांचे सर
मम रोम रोम मोहरले.
वेलीवर झुकल्या फ़ुलांनी
रानी गालिचे चितारिले,
स्पर्शिता अधीर अधरांनी
अल्हद पानोपानी बहरले.
बावरे पाखरू भिरभिरुनी
तरुवरी अलहदा विसावले,
बिलगुनी कुशीत आतुर मी
सतरंगी स्वप्न साकारले.
ओलेत्या मृदगंधातुनी
पोपटी तृणांकुर तरारले,
आसुसलेले दोन देहभान
साजण साजरे एकरूपले.

