ओला पाऊस
ओला पाऊस
झिलमिल लडी ह्या मोतियाच्या सरी,
झेपावता धरती माती झाली चिंब ओली.
भुरभुरणाऱ्या तो पहिल्या पावसाचा मृदगंध
वेडावुनी साद घाली मना दाटुनी येता भावबंध.
ते कोवळ्या उन्हातले इंद्रधनुष्याचे सप्तरंग
झिरपुनी अंतरी मोहोरले मी अंग अंग.
कोकिळेची पाना आडून ती कुहू कुहू साद
ऐकताना आजही हुरहुरत येते तुझीच याद.
त्या ओल्या पावसाच्या रिमझिम चिंब सरी
बरसता देही नकळत तरारली उन्मत शिरशिरी.
हिरव्या ह्या बनी अंकुरली ... होवुनी तृप्त अवनी.
येशील कधी रे ....आतुर जाहली आज साजणी.

