STORYMIRROR

Deepali Mathane

Romance

3  

Deepali Mathane

Romance

प्रीत फुलली

प्रीत फुलली

1 min
368

प्रीत फुलली अंतरी

जीव भारावला सारा

गात मेघ मल्हारी

आसमंत गंधाळला सारा

   अधीर मन हे सख्या

   भावनांचा सोहळा सारा

   शब्द ओंजळ करूनी रिती

   पापणी देई कडा पहारा

श्वासात श्वास मिसळला

भिनला गार-गार वारा

गूज उलगडूनी प्रीतीचे

बरसल्या प्रीतीच्याच धारा

    उधळीत रंग प्रीतीचे

    घेऊनी गंध फुलांचा सारा

    भान हरपले साद घालूनी

   वेचित कुंद कळ्यांचा पसारा

अवचित भेटीची आस लागली

प्रीतीचा उठला शहारा

मन बहरले आज सख्या

भेटू दे मिलनाचा किनारा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance