प्रीत जन्मजन्मांतरीची
प्रीत जन्मजन्मांतरीची
अविरत आहे आतुरता
तुला भेटण्याची
तुझ्या सोबतीची
होईल का ती इच्छा
पूर्ण माझ्या मनाची
कदर आहे का तुजला
माझ्या निस्सीम प्रेमाची
गरज वाटते मजला
तुझ्या सोबतीची
सदैव लागू दे ती
सवय माझ्या मनाला
तुझ्या प्रेमस्पर्शाची
आस या जीवाला
असतो सदैव हा
ध्यास माझ्या मनाला
हा ध्यास पूर्ण होतो
तुझ्या दर्शनाने
हा ध्यास पूर्ण होतो
तुझ्या मिलनाने
ते क्षण असावे सोबती
सदैव बरोबर आपल्या
हीच ईच्छा मनाची
हीच भावना मनाची
प्रीत तुझी न माझी
राहू दे जन्मजन्मांतरीची
प्रीत तुझी न माझी
राहू दे जन्मजन्मांतरीची

