STORYMIRROR

Jyoti gosavi

Romance

4  

Jyoti gosavi

Romance

परी राज्यातील एक परी

परी राज्यातील एक परी

1 min
425

परी राज्यातील एक परी

चुकून उतरली भूवरी

गाढ झोपेत ती सुंदरी

अवतरली माझ्या घरी


तिचा तो जादूचा पलंग

रंग त्याचा सोनेरी

परांच्या मऊ उशा गाद्या

त्यावर पहुडलेली नीलपरी


गोरा गोरा रंग तिचा

केस तिचे सोनेरी

तिच्या प्रभेच्या किरण शलाका

नाचती चेहऱ्यावरी


हरपले माझे भांन

पाहुनी तिचा मुखडा

वाटते की हिच्यापुढे

फिका चंद्राचा तुकडा


स्पर्श करण्यात पुढे गेलो

झालो होतो मी वेडा

स्वप्नातुनी मज जाग आली

तर हाती होता गोधडी चा तुकडा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance