प्रगत भारत
प्रगत भारत
भारत देशाचे नागरिक आम्ही
आहे देशाचा आम्हाला अभिमान
सलाम करु स्वातंत्र दिनी शुरविरांना
भारत आमुचा आहे महान..... //१//
माझ्या स्वप्नातला भारत आहे
भरलेला हिरव्या हिरव्या शेतीनी
शेतकरी असावा आंनदी
पिके उगवती ते मेहनतीनी.... //२//
जातीभेद देशात संपून जावे
उच्च निच्चताचे नसावे स्थान
एकजुटीने भारतीय सारे राहावे
एकमेकांना द्यावा मान, सन्मान.... //३//
हुंडाबळी, बलात्काराचे भारतात
नावही ओठांवर नसावे
स्त्रीजातीला देऊनी सन्मान
संरक्षण तीचे करावे..... //४//
तंत्रज्ञान,उद्योगात होऊनी प्रगती
बेरोजगार मिटूनी जावा
कला क्षेत्राला महत्व मिळूनी
उपाशी कोणी भारतीय नसावा.... //५//
एकतरी पुत्र दान करावा
प्रत्येक आईने आपला देशासाठी
लहान मुलं, तरुणांमधे येईल स्फुर्ती
कार्य करतील प्रगत भारतासाठी ... //६//
