STORYMIRROR

Ankita Mahulkar

Others

3  

Ankita Mahulkar

Others

पाऊस

पाऊस

1 min
254

मेघ दाटले अंबरात

कृष्ण रंगात रंगला

पाऊस येऊनी अलगद 

मिठी मारली धरणीला....... //१//


पावसाच्या सरींनी घातला 

थंड वाऱ्यासोबत मेळ 

फुले, पाने, झाडे सगळे 

खेळू लागले बघा खेळ..... //२//


सुंदर आपल्या रंगासंगे 

इंद्रधनूही हजेरी लावतो 

कोकीळेच्या गाण्याने

मोर मयुरा नाचू लागतो...... //३//


वसुंधरा हि सजली कशी 

नेसुनी शालू हिरवा हिरवा 

मन मोहून टाकणारा 

असा हा ऋतू बरवा....... //४//


पावसात मग भिजण्याचा

वेडा छंद लागतो मनाला 

येताच सुगंध मातीचा 

किंमत काय त्या अत्तराला..... //५//


नदी नाल्यांना होई आंनद 

दुधाळ झरा वाहे डोंगरातूनी 

रमनीय असा हा नजारा 

देई अंतरंग मन भिजवूनी.... //६//


पावसाच्या आगमनाने 

बळीराजा सुखावतो 

पेरणी करुनी आनंदाने 

सृष्टी हिरवळ बनवतो.... //७//


Rate this content
Log in