Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ankita Mahulkar

Others

3  

Ankita Mahulkar

Others

बाप

बाप

1 min
226

एका बापाची ही व्यथा 

सांगते त्याची ही काया 

कळेल ते काय सांगा 

बाप संसाराची माया... //१//

ऊन पावसात राबे 

कण कण ते जोडून 

लेकरांना बाप देई 

सुख सागरा लोटून... //२//

दुःख डोंगर घेऊन 

सतत ते चालतात

आपल्याला आंनदी 

वाटेवर वळवितात.... //३//

प्रत्येकाच्या लिहीण्यात

आई हा शब्द असतो

आपल्याला घडविणाऱ्या 

बापाचा उल्लेख नसतो... //४//

दोन घास भरविणारी

आई नक्कीच आठवावे 

ती शिदोरी घरात आणणारे 

बाबा का ते विसरावे.... //५//

बाप असतो उभा

काळजीच्या त्या दारी 

बापामुळे समजते 

खरी ती दुनियादारी.... //६//

बाप लावी वेडा जीव

पोरीला ठेवी प्रेमानं

काळीज काढून देई 

करूनी कन्यादानं.... //७//

अडचणीच्या समोरी

बाप असतो सहारा

घेई आवरून वेळी

संसाराचा तो पसारा... //८//

Rate this content
Log in