STORYMIRROR

Manisha Awekar

Romance Others

4  

Manisha Awekar

Romance Others

प्रेरणा

प्रेरणा

1 min
437

भेट थोर संगीतकारांची

प्रभावित करी मजला

साधा सोज्वळ शांत स्वभाव

मनास स्पर्शूनी गेला


भेट ठरली तेव्हा

धाकधूक मनामधे

सर्वसामान्य आम्ही दोघे

कसे होईल भेटीमधे?


अनुमतीसह त्यांनी

पूर्ण पत्ताही दिधला

भेटीमधे अनौपचारिक

सुखसंवादही साधला


हिमालयाएवढे कर्तृत्व तरीही

खळे सरांचे पाय जमिनीवरी

गप्पा गोष्टी संवाद रंगला

उदार ते अंतःकरणी


मनोभावे घेतले दर्शन

आशिर्वाद दिधला भावे

भेट सरली तरीही

चित्र आजही मनामधे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance