STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Romance

3  

Sanjay Raghunath Sonawane

Romance

प्रेमवेडा पाऊस

प्रेमवेडा पाऊस

1 min
479


तुझ्यासाठी प्रेमवेडा आतूर मी झालो

तुला पाहण्यासाठी स्वप्नात रंगलो


तुझ्या प्रेमात मी वेडापिसा झालो

तुझ्या स्पर्शाने मी सुखावलो


नाते तुझे माझे कसे अवचित जडले

नकळत तू माझी झाली हे मीच ओळखले


तू आहे सर्वांसाठी मनाने खरी निर्मळ

तुझ्या भावना माझ्यासाठी आहे प्रेमळ


कुणी कितीही जळू दे होणार नाही काही

माझी प्रीत तुझ्याशिवाय दुसऱ्यावर नाही


तूच माझी सखी मी तुझा प्राणनाथ

तूच माझी जीवलग ही तुला शपथ


मी नाही लोभी फक्त फायद्यासाठी

जगासाठी आयुष्य ही श्रीमंती माझ्यासाठी


प्रेम माझे आहे तुझ्यावर हृदयापासून

होणार नाही वेगळा मी तुझ्या मनातून


नाती मनामनाची साथ सात जन्माची

अशीच राहो ही भावना दोन जीवांची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance