प्रेमरंग पावसाचा (अष्टाक्षरी)
प्रेमरंग पावसाचा (अष्टाक्षरी)
रिमझिम पावसात
ओलीचिंब झाली माती
ओला ओला गंध आला
बहरली गं धरती.....
धुंद धुंद पावसात
माझी वळवाची प्रीत
सूर गुंफले मनीचे
मन होई पुलकीत......
प्रेमरंग पावसाचा!!!!
गर्द रेशमी अंगाचा
पानांतून नाद वाजे
मेघ सावळ्या रंगाचा.....
मेघ सांडला सांडला
रानी वनी ओसंडला
सप्त रंगाचा कंदील
त्याने आकाशी टांगला.......

