दीपावली आली
दीपावली आली
सोनेरी प्रभा,सर्वत्र पसरली
पहाट गारव्यात, न्हाऊन गेली
लक्षलक्ष दिव्यांचे, तोरण ल्याली
भावा बहिणीचे नाते करण्या दृढ
आली,आली, दिवाळी आली..२
चंदन,उटण्याचा स्पर्श सुगंधित
मिठाई फराळाची न्यारी लज्जत
स्नेहाची,आनंदाची उधळण करीत
नात्या नात्यांची विण करण्या घट्ट
आली,आली,दिवाळी आली...३
अंगणी रंगावलीचा शालू भरजरी
कंदील आकाशी,पणत्या दारोदाऱी
येवो सुख-समृद्धी प्रत्येकाच्या घरी
लक्ष्मीमाता पूजना येई,सोनपावली
आली,आली,दिवाळी आली..४
आनंदोत्सवाचा पवित्र सण,
सर्वांनी करूया एकची प्रण
फटाके,आतिषबाजी न करून
प्रदूषण मुक्त ठेऊ पर्यावरण..
आली,आली शुद्ध हवेची दिवाळी आली...५
