जाता जाता पावसाने
जाता जाता पावसाने
1 min
147
जाता जाता पावसाने
मांडला किती उच्छाद
समस्त शेतकऱ्यांचा
रोखलास रे श्वास..१
इतका का बरसला
त्याचे वाया गेले कष्ट
भेटण्या आसुसलेल्या
पाऊस त्यावर रुष्ट..२
शाना शाना म्हणताना
वेड्यागत तु वागला
इतका कसा बेफाम
थांबणच विसरला..३
साऱ्या जगाचा पोशिंदा
होत्याचं नव्हतं झालं
अन्नासाठी झाला मिंधा
आलेलं वाहून गेलं..४
नाही होत हतबल
माझा बळीराजा शूर
करुनी नवा निश्चय
तो उगवी बीजांकूर..५
पेरण्या पुन्हा शिवार
उभा राहिला जिद्दीनं
घेतला हाती नांगर
स्वप्न पाहून नव्यानं...६
