औक्षण
औक्षण
भाऊ-बहिणीच्या जिव्हाळ्याची
सुगंधी स्नेहभावाची साठवण
तेजाळले प्रेमभरे नेत्र निरांजन
बहीण करी भाऊरायाचे औक्षण..१
सण भाऊबीज करी, नातेबंध दृढ
गेल्या उजळुनी, स्नेहाच्या अष्टदिशा
मिळो उदंड आयुष्य माझ्या भावास
करी मंगलकामना, बहीण परमेशा..२
दिनी भाऊबिजेच्या औक्षण करता
भाऊराया देई ओवाळणी प्रेमाने
निरामय भावनेने जपावे बंधनास
जसे जपले हळुवार ज्ञाना मुक्ताईने..३
स्नेहाचे, पावित्र्याचें, असेही नाते
हे रक्ताचे असो, वा संबंध प्रेमाचे
संकटसमयी बहिणीचे रक्षण करुनी
वस्त्रहरण टाळीले कृष्णाने द्रोपदीचे..४
जपावा बंध आपुलकीचा, मानवतेचा
नेहमी आई भगिनींचा आदर करा
मग ती कुणाचीही असो माय बहिण
छत्रपतीशिवरायांची हीच विचारधारा.५
