शिक्षण गाणे
शिक्षण गाणे
शिक्षण गाणे गातच राहावे...
देण्यासारखे देत जावे, पुढे पुढे चालावे ll धृ ll
आनंददायी आपुले शिक्षण
प्रगतीचे हे असे लक्षण
मनोरंजनातून शिक्षण द्यावे,
पुढे पुढे चालावे........ ll १ll
नव उपक्रमांची करा निर्मिती
राबवा अन् करा गमती
मुलांत रमती आणि खेळती तेच शिक्षक जातीचे
शिक्षण गाणे गातच.......... ll२ll
शैक्षणिक साहित्यांची जत्रा
शिकण्या लागू पडे मात्रा
साहित्यातून ज्ञान द्यावे, दृढीकरण करावे
शिक्षण गाणे गातच............. ll ३ll
बालकांचा सर्वांगीण विकास
उद्याचा सुजाण नागरिक खास
हेच ध्येय आणि ध्यास
शिक्षणामुळे दूर होई अज्ञान
शिक्षण गाणे गातच............ ll४ll
