प्रेमपाश
प्रेमपाश
युद्धात मी आहे तरी प्रेमात का वाटायचे
गर्दीतही डोळे कसे राणी तुला शोधायचे
रानातल्या वाटेवरी प्रेमात मी वेडा उभा
येणार तू सांगून मोरांनी किती नाचायचे
डोळ्यातला कावा मला नाही कळाला साजणी
खोटारड्या शपथा मला देऊन तू झुलवायचे
वादातही नाहीस तू आणून मोठी वादळे
मी वादळांशी झुंजतांना श्वासही थांबायचे
का अमृताचे कुंभ वाटावे सखीचे ओठ ते
प्याले विषाचे प्रेम माझे पण मला ते प्यायचे
