STORYMIRROR

Shashikant Shandile

Romance

2  

Shashikant Shandile

Romance

प्रेममंथन

प्रेममंथन

1 min
2.5K


कटता न कटे जीवन

अवघड प्रत्येक क्षण

जरी व्याकुळ अंतर्मन

करतोय प्रेमाचे जतन

म्हणून,

हृदयी केले प्रेममंथन

जाणता बांधीले हृदयाशी

बघता रूप ते साधेपण

आठवण येता आजही

भरून येते अधीर मन

म्हणून

हृदयी केले प्रेममंथन

उगाच बांधून स्वप्न उराशी

अपेक्षांची राख झाली

देऊन प्रेम प्रेमासाठी

प्रेमाचीच लाज आली

म्हणून

हृदयी केले प्रेममंथन

मंथनात समजून आले

विरह नशिबी मिळाले

भिजल्या डोळ्यांनी हसण्या

मन माझे सज्ज झाले,

भिजल्या डोळ्यांनी हसण्या

मन माझे सज्ज झाले

म्हणूनच

हृदयी केले प्रेममंथन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance