प्रेमकोडे
प्रेमकोडे
प्रेमाचे कोडे भारी अवघड,
उलगडतच नव्हते,
टाकले शब्द भावनांचे माझ्या,
तरी काही रकाने रिकामेच होते,
कितीतरी केला कठोर प्रयत्न,
केला मग स्वतःशीच प्रश्न,
की, कमी होईल कोड्याचे यत्न,
विचार केला वेळ थोडा, टाकले तुझेच नाव होऊन थोडा वेडा,
कमालच झाली गड्या,
न उलगडणारे कोडे आता बरे उलगडले, माझ्या प्रेमकोड्यात होते तुझेच नाव जुळले..

