STORYMIRROR

Karuna Gurav

Romance

3  

Karuna Gurav

Romance

प्रेमगीत

प्रेमगीत

1 min
11.8K

हा चंद्र सोबतीला, मैफील रात आहे

बेधुंद जीव झाला, हातात हात आहे


गंधात गुंतलेला, नाजूक शुभ्र चाफा

बेहोश भावनांचा, झुंजार वात आहे


हा स्पर्श साजणाचा, बेभान जीव झाला

हा वात झोंबणारा, प्रेमात गात आहे


ही नजर साजणाची, मज इंच इंच जाळी

घेता मिठीत मजला, रंगीन बात आहे


गंधाळली ही स्वप्ने, हृदयात साठले रे

मोहीत बंदिखाना, तुझीच साथ आहे


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Romance