Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Karuna Gurav

Others

3.0  

Karuna Gurav

Others

मुकुट तो भारी

मुकुट तो भारी

1 min
23.6K


 *साऱ्या जगास तो रे , डिवचून आज गेला* 

*हा मुकुट ताज भारी , सजवून आज गेला.*


 *होते निवांत सारे , संसार व्यापलेला*

*बसल्या घडीस तो रे , खिळवून आज केला*


 *ही जात-पात वेडी , देशास ग्रासलेली*

 *नादान तो शहाणा , मिटवून आज गेला*


 *हे हात गुंतलेले , मोहात लालसेच्या*

*सारेच शुन्य आहे , शिकवून आज गेला*


 *पोटास त्या भुकेल्या , आधार भाकरीचा*

 *पैशास अर्थ नाही , गिरवून आज गेला*


 *विश्वात माजलेले , काहूर संकटाचे*

 *या मानवात नँनो , मिरवून आज गेला*


 *नाहीच मुक्त आता , धाकात कोंढलेला*

*टेंबाच मानवाचा , जिरवून आज गेला*

 

 *येईन मी कसाही , कळणार ना तुम्हाला*

*फितूर भामटा हा , हरवून आज गेला*


 *निष्पाप बालकांचा , आक्रोश यातनांचा*

 *हृदयास पामराच्या , खिळवून आज गेला*


 *सहकार्य लाभलेले , पळवेल रावणाला*

*हा श्वास सूटकेचा , भरवून आज गेला*


 *एकीच भारताची , प्रेमात बांधलेली*

 *जाणार मी उद्याला , ठरवून आज गेला*


Rate this content
Log in