STORYMIRROR

Karuna Gurav

Others

2  

Karuna Gurav

Others

मातृप्रेम

मातृप्रेम

1 min
14.3K


 नाजूक या कळीपरी

 जीवन तुझे कोमल

सुगंध देत जगाला

 भरभरून उमल

 तप्त वसंतात फुले

 हा सुगंधित मोगरा

 धगधगते आयुष्य

 होऊ नकोस बावरा

 फुलात फुल गुंफुनी

 होईल हार , गजरा

 कर्तृत्वाने कर तुझा

 यशाचा दिन साजरा

 शोभेल सुंदर हार

 शंभू देवाच्या मंदिरी

 कळस सुखाचे गाठ

ही इच्छा माझ्या अंतरी

 संकटाच्या चिखलात

सुगंध देत जगाला

 भरभरून उमल


Rate this content
Log in